Ad will apear here
Next
मौनांतर मूकनाट्य स्पर्धेत ‘रायसोनी’चे यश


पुणे : वाघोली येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘मौनांतर २०१८’ या मूकनाट्य स्पर्धेत यश मिळवत उत्तेजनार्थ पदक पटकावले. ड्रीम्स रिऍलिटी, वाइड विंग्स मीडिया आणि फेअरी टेल मीडिया यांच्या वतीने ही मूकनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती.

अभिनव जेऊरकर या विद्यार्थ्याला उत्तम पटकथेसाठी, तर किरण कांबळेला उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत एकूण २७ संघ सहभागी झाले होते. त्यातील २० पुण्यातले, तर ७ मुंबईचे होते. पुण्यातील भरतनाट्य मंदिर व मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे ही स्पर्धा झाली. प्रसाद वनारसे आणि गिरीश परदेशी यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.

महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी मेहनत घेतली. रायसोनी शिक्षण संस्थेचे संचालक अजित टाटिया, प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर, उपक्रम समन्वयक प्रगती कोरडे यांनी उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZZMBR
Similar Posts
यंदा ‘मौनांतर’ पुण्यासह, मुंबईतही रंगणार पुणे : वाइड विंग्ज मीडिया, ड्रीम्स टू रिअॅलिटी व फेअरी टेल मीडिया स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात आयोजन केली जाणारी मौनांतर मूकनाट्य स्पर्धा यंदा पुण्याबरोबरच मुंबईतही होणार आहे. मागील दोन वर्षांत या स्पर्धेला इतरही जिल्ह्यांमधून, विशेषतः मुंबईहून येणारा प्रतिसाद पाहता
‘मौनांतर’ मूकनाट्य स्पर्धेत ‘बी अ मॅन’ प्रथम पुणे : यावर्षी घेण्यात आलेल्या ‘मौनांतर’ या मूकनाट्य स्पर्धेत पुण्याच्या केसर प्रॉडक्शन्सची ‘बी अ मॅन’ एकांकिकेने पहिल्या क्रमांकावर नाव कोरले. पुण्याच्याच अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या ‘ओह शिट’ने दुसरा, तर डोंबिवलीच्या अॅबस्ट्रॅक्ट आर्टच्या ‘सीड ऑफ आर्ट’ एकांकिकेने तिसरा क्रमांक पटकावला.
‘वाइड विंग्ज’तर्फे ‘पुणे नाट्यसत्ताक २०१९’ची घोषणा पुणे : वाइड विंग्ज मीडिया यांच्या वतीने चौथ्या ‘पुणे नाट्यसत्ताक २०१९’ महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. ११ ते १३ जानेवारी व १८ ते २० जानेवारी अशा दोन टप्प्यात हा महोत्सव होणार असून, २३ संस्था, २३ सादरीकरणे, पाच नाट्यगृहे असे या महोत्सवाचे स्वरूप असेल. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवातील सादरीकरणे सुदर्शन
पुणे येथे ‘नाट्यसत्ताक रजनी २०१८’ पुणे : गाजलेल्या नाटकांच्या, पुणे नाट्यसत्ताक महोत्सवातील नाट्यसत्ताक रजनी यंदाच्या प्रजासत्ताकदिनी मोठ्या उत्साहात पार पडली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language